पाकिस्तानच्या 7 कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी

इस्लामाबाद : आण्विक तंत्रज्ञानाच्या अवैध प्रसारात सहभागावरून पाकिस्तानच्या 7 कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाने बंदी घातली आहे. देशाची सुरक्षा आणि धोरणासाठी धोकादायक ठरलेल्या विदेशी कंपन्यांच्या यादीत या पाकिस्तानी कंपन्यांचा समावेश अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या या कंपन्यांच्या निर्यातीवर बंदी घातली जाऊ शकते. एनएसजीत प्रवेश मिळविण्याच्या पाकच्या महत्त्वाकांक्षेला देखील अमेरिकेच्या या निर्णयामुळे मोठा दणका बसला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. या कंपन्यांना निर्यातीवेळी कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.

7 पैकी 3 कंपन्यांवर असुरक्षित आण्विक कृती केल्याचा आरोप आहे. पाकच्या कंपन्यांचे हे कृत्य अमेरिकेचे सुरक्षा धोरण आणि विदेश धोरणाच्या विरोधात आहे. दोन कंपन्यावर आण्विक सामग्री जमा केल्याचा आरोप आहे. तर उर्वरित दोन कंपन्या अन्य कंपन्यांसाठी मुखवटा म्हणून काम करत होत्या. पाकिस्तानच्या एका कंपनीचे कार्यालय सिंगापूरमध्ये आहे. यादीत कराची, लाहोर आणि इस्लामाबादच्या काही कंपन्यांचे पत्ते देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या एंड युजर रिह्यू कमिटीने (ईआरसी) 23 कंपन्यांचा यादीत समावेश केला आहे. पाकिस्तानच्या 7 कंपन्यांसोबत यादीत दक्षिण सूदानच्या 15 तर सिंगापूरच्या एका कंपनीचा समावेश आहे. निर्यातीवर बंदी घालण्यासोबत या कंपन्यांचा परवाना रद्द करण्याचे पाऊल उचलले जाऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)