पाकिस्तानच्या 6 नेत्यांना दहशतवादी हल्ल्याचा धोका

इस्लामाबाद : निवडणूक प्रचारादरम्यान दहशतवाद्यांकडून जीवाला धोका असणाऱया 6 नेत्यांची नावे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी प्राधिकरणाने (नॅक्टा) प्रसिद्ध केली आहेत.

या 6 जणांमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान, अवामी नॅशनल पार्टीचे नेते असफंदियार वाली आणि अमीर हैदर हौती, कौमी वतन पार्टीचे प्रमुख अफताब शेरपाओ, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलचे नेते अक्रम खान दुर्रानी आणि हाफिज सईदचा मुलगा तहला सईद यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-एनच्या वरिष्ठ नेतृत्वाला देखील धोका आहे.

नॅक्टाने या 12 धोक्यांच्या इशाऱयाची माहिती केंद्रीय तसेच प्रांतीय गृह मंत्रालयाला दिल्याचे प्राधिकरणाचे संचालक फारुख यांनी सांगितले. 25 जुलै रोजी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान हिंसाचार भडकण्याची शक्यता पाहता हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे पाकच्या संसदीय समितीने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)