पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणार चीनचे उपपंतप्रधान

वाढत्या जवळिकीचा आणखी एक दाखला

इस्लामाबाद -चीनचे उपपंतप्रधान वांग यांग 14 ऑगस्टला होणाऱ्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारतद्वेषाने पछाडलेल्या या दोन देशांमधील वाढत्या जवळिकीचा आणखी एक दाखला म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे.

पाकिस्तानच्या दोनदिवसीय दौऱ्यासाठी वांग यांच्या नेतृत्वाखालील चीनचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ उद्या (रविवार) दाखल होईल. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी विशेष बाब म्हणून वांग यांना पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याचे निर्देश दिले आहेत. चीन आणि पाकिस्तान हे देश एकमेकांच्या मैत्रीला किती महत्व देतात हे दाखवण्याचा खटाटोप म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये 16 जूनपासून भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले आहेत. त्यावरून दोन देशांमध्ये पेचाची स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर वांग यांचा पाकिस्तान दौरा होत आहे.

कायम काश्‍मीर मुद्‌द्‌याचे तुणतुणे वाजवणाऱ्या पाकिस्तानबरोबर विविध कारणांवरून भारताचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेही वांग यांच्या पाकिस्तान दौऱ्याला महत्व आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला दिल्या जाणाऱ्या पाठिंब्यावरून भारताने नेहमीच त्या देशाला जागतिक स्तरावर उघडे पाडले आहे. भारताची भूमिका मान्य करत अमेरिकेनेही पाकिस्तानबरोबरच्या सहकार्यात लक्षणीय कपात केली आहे. या घडामोडींनंतर आता पाकिस्तान आणि चीन एकमेकांबरोबरची जवळीक वाढवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)