पाकिस्तानच्या ‘या’ गोलंदाजाने मोडला 82 वर्षापूर्वीचा जूना विक्रम

अबूधाबी – अबूधाबी येथे सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाहने आपल्या नावे एक विक्रम केला आहे. या सामन्यात यासिर शहाने न्यूझीलंडचा फलंदाज विलियम एडगर रिचर्ड सोमरविले याला बाद करत आपल्या कारकिर्दीतील 200 वा बळी पूर्ण केला. तसेच याबरोबर क्रिकेट जगतातील सर्वात कमी सामन्यात 200 बळी पूर्ण करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.

-Ads-

यासिर शाहने 82 वर्ष जूना असा ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट यांचा विक्रम मोडला. क्लॅरी ग्रिमेट यांनी 1936 मध्ये जोहन्सबर्ग येथे झालेल्या दक्षिण अफ्रिकविरूध्दच्या सामन्यात 200 बळी पूर्ण केले होते. त्यांनी ही कामगिरी 36 सामन्यांमध्ये पूर्ण केली होती. 32 वर्षीय यासिर शाहने 33 कसोटी सामन्यातच 200 बळी घेण्याची एेतिहासिक कामगिरी केली आहे.

यासिर शाह सध्या शानदार फाॅर्ममध्ये आहे. न्यूझीलंड विरूध्दच्या मालिकेत त्याने आतापर्यंत 27 बळी घेतले आहेत. दुसऱ्या सामन्यात त्याने 184 धावा देत 14 विकेट घेतल्या होत्या. ही पाकिस्तानकडून आतापर्यंतची दुसऱ्या क्रमाकांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासिर खानच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)