पाकिस्तानच्या भावी पंतप्रधांनांची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी

पेशावर – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांची तेथिल (एनबीए) भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून खैबर पख्तुन प्रांतातील सरकारच्या हेलिकॉप्टरच्या गैरवापरा मुळे झालेल्या 2.17 कोटींच्या नुकसान प्रकरणी चौकशी करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणी इम्रान खानयांनी आपल्या वरिल सर्व आरोप फेटाळुन लावले असून हे प्रकरण राजकिय दृष्टया प्रेरीत असून माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप केला आहे.

तेथिल भ्रष्टाचार विरोधी पथकाने 3 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांना सरकारी हॅलिकॉप्टरचा खाजगी वापर केल्या संदर्भात समन्स बजावला होता. यावेळी त्यांनी इम्रान खानहे 2013 साला पासून सरकारी हॅलिकॉप्टरचा खाजगी कारणांसाठी वापर करत असल्याचा आरोप केला जात होता. खान यांनी या सरकारी हॅलिकॉप्टरचा वापर जवळपास 72 तासांपेक्षा जास्त काळ उडानासाठी वापर केल्याचा आरोप ही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

-Ads-

ज्याच्या मुळे सरकारचे जवळपास 2.17 कोटींचे नुक्‍सान झालेहोर्ते या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथक त्यांची चौकशी करणार होते. या प्रकरणी एनबीएने 15 इम्रान खान आणि त्यांच्या वकिलाला 15 प्रश्‍न विचारले असून या 15 प्रश्‍नांची उत्तरे आगामी 15 दिवसांच्या आत देण्याची सुचना त्यांना करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)