पाकिस्तानच्या नव्या संसदेचे सोमवारी पहिले अधिवेशन

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंधराव्या संसदेचे पहिले अधिवेशन येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर नॅशनल ऍसेम्ब्लीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे. त्यानंतर सभागृहात पंतप्रधानपदासाठी निवड होणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत पार पाडली जावी अशी अपेक्षा आहे.

या संसदेत 272 सदस्य लोकांमधून थेट निवडून आले असून त्याखेरीज 60 महिला सदस्य आणि 10 धार्मिक अल्पसंख्याक सदस्यांची या संसदेवर नियुक्ती केली जाते त्यामुळे हे सभागृह एकूण 342 सदस्यांचे होते. थेट निवडून आलेल्या सदस्यांपैकी 180 सदस्यांचा तहरीक ए इन्साफ या पक्षाला पाठिंबा आहे त्यामुळे या पक्षाचे नेते इम्रान खान हे या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. ही औपचारीकता 14 ऑगस्ट पुर्वी पार पाडली जाईल अशी शक्‍यता आहे.

-Ads-

स्वत: इम्रान खान हे देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 14 ऑगस्टला शपथ घेण्यास उत्सुक आहेत पण नॅशनल ऍसेम्ब्ली स्थापन करण्याची सारी औपचारीकता 15 ऑगस्ट पुर्वी पार पडेल अशी शक्‍यता नसल्याने इम्रान खान हे 14 ऑगस्टला शपथ घेऊ शकतील की नाहीं या विषयी साशंकतेचे वातावरण आहे. तशातच पाकिस्तानचे अध्यक्ष हुसेन हे 16 ऑगस्ट पासून तीन दिवसांच्या आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अध्यक्षांनी आपला हा दौरा तात्पुरता रद्द करावा अशी विनंती इम्रान खान यांच्या पक्षाने अध्यक्षांना केली आहे.

जरी अध्यक्षांनी आपला दौरा पुढे ढकलला नाही तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून सिनेटचे चेअरमन सादीक संजीरानी हे नवीन पंतप्रधानांना शपथ देऊ शकतील अशी माहिती इम्रान खान यांच्या पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)