पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा भागात प्रसिद्ध शीख धर्मगुरूची हत्या

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य समुदायावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत घडत असतात. अशाच प्रकारची एक घटना खैबर पख्तुनवा भागात घडली आहे. मंगळवारी या भागात एका प्रसिद्ध शीख धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. 52 वर्षीय शीख धर्मगुरू चरणजीत सिंह हे मानवाधिकार कार्यकर्ताही होते.

मीडियाने दिलेल्या माहितीनुसार चरणजीत सिंह हे पख्तुनवा प्रांताची राजधानी पेशावर येथे राहत होते. तेथील स्कीम चौक भागात त्यांचे दुकान होते. मंगळवारी हल्लेखोराने त्यांच्या दुकानात शिरून त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या घातल्या आणि तो पळून गेला. गोळ्या लागल्यानंतर चरणजीत सिंह यांचा जागेवरच मृत्यू झाला.

चरणजीत सिंह यांची हत्या अल्पसंख्याक ते समुदायाचे असल्यामुळे करण्यात आली, की त्यामागे काही वैयक्तिक कारण होते हे समजू शकले नाही, असे पेशावरचे पोलीस अधीक्षक सद्दार शौकत खान यांनी सांगितले आहे. चरणजीत सिंह हे गेली अनेक दशके पेशावरमध्येच राहत होते. मात्र त्यांचे कुटुंबीय कुर्रम भागात राहत होते. त्यांच्या हत्येमुळे अल्पसंख्य समुदायात दहशत पसरली आहे.

गेले काही दिवस पाकिस्तानमध्ये शीख समुदायातील व्यक्तींच्या हत्या होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)