पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी २० टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारा निधी पूर्णपणे कमी करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी   पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ष २०१८-१९ साठी पाकिस्तानने आपल्या अंदाजपत्रकात संरक्षण क्षेत्रासाठी २० टक्के अधिकची तरतूद केली आहे.

पीएमएल-एन सरकारच्या कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात येते. लष्कर आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या मतभेद आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण निधीतील वाढ खूप महत्वपूर्ण मानली जाते. दहशतवाद ते युद्धाशिवाय पाकिस्तानचा संरक्षण खर्च नेहमी भारतावर केंद्रित असाच राहिलेला आहे. अणुसंपन्न असलेल्या दोन्ही देशांमध्ये नेहमी तणाव असतो.

गेल्या काही दिवसांत नियंत्रण रेषा आणि सीमेजवळील सततच्या गोळीबारामुळे तणाव वाढलेला आहे. दरम्यान, या वर्षीच्या प्रारंभीच भारताने संरक्षण क्षेत्राच्या अंदाजपत्रकात ८ टक्क्यांनी वाढ केली होती. परंतु, भारताचे एकूण संरक्षण अंदाजपत्रक पाकिस्तानच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)