पाकिस्तानचे माजी पंतप्रधान अब्बासींविरुद्ध पकडवॉरंट जारी

इस्लामाबाद (पाकिस्तान्‌): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्याविरुद्ध पकडवॉरंट जारी करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना एका उच्चस्तरीय बैठकीची माहिती देण्यावरून लाहोर उच्च न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केले आहे,

सन 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असे नवाज शरीफ यांनी मे महिन्यात डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. नवाज शरीफ यांच्या वक्तव्यानंतर सरकार आणि लष्कर यांच्यातील तणाव वाढला होता. अब्बासी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीची महिती अब्बासी यांनी शरीफ यांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अब्बासी यांनी गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन केल्याचा, सुरक्षा दलांचा अवमान केल्याचा याचिकाकर्त्याचा दावा आहे. अब्बासी यांच्या विरोधात राजद्रोहाचा आरोपाखाली कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)