पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री न्यायालयाकडून अपात्र

अरब अमिरातीमधील वर्क परमिट बाळगल्याचा ठपका

इस्लामाबाद – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांना आज तेथील उच्च न्यायालयाने अपात्र ठरवले. पाकिस्तानमध्ये 2013 ची निवडणूक लढवण्यापूर्वी आसिफ यांनी त्यांच्याकडील संयुक्‍त अरब अमिरातीचे वर्क परमिट लपवले असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे सत्तारुढ पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ शरीफ गटाला निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर आणखी एक दणका बसला आहे.

-Ads-

इस्लामाबाद उच्च न्यायालयातील तीन सदस्यीय पिठाने आसिफ यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय एकमताने दिला आहे. आसिफ हे सत्यवचनी आणि प्रामाणिक नाहीत आणि राज्यघटनेतील संबंधित कलमानुसार त्यांना अपात्र ठरवण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. ख्वाजा आसिफ यांच्याविरोधात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पार्टीचे नेते उस्मान दर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आसिफ यांच्याकडे “इग्मा’ (अमिरातीतील वर्क परमिट) असल्याने त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी दर यांनी केली होती. आसिफ यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी आपला रोजगार आणि पगार जाहीर केला नव्हता. त्यामुळेच दर यांनी आसिफ यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला आव्हान दिले होते. 2013 च्या निवडणूकीत आसिफ यांच्याकडून दर यांचा पराभव झाला होता.

उच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्याने ख्वाजा आसिफ आता आयुष्यभर सार्वजनिक जीवनात अथवा पक्षामध्ये कोणत्याही पदावर राहू शकणार नाहीत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सौदी अरेबियात आपल्या मुलाच्या कंपनीत काम करण्याचे तथ्य जाहीर न केल्याबद्दल यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे.

आसिफ यांनी मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. आपण निवडणूकीपूर्वी वर्क परमिट लपवलेले नव्हते, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)