इस्लामाबाद -खोटारडेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानने आज चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेचा प्रस्ताव दिल्याचा दावा केला. मात्र, नंतर पलटी मारत पाकिस्तानने तसा प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मोदींकडून चर्चेचा प्रस्ताव आल्याचा दावा केल्याशी संबंधित वृत्त प्रसारमाध्यमांनी दाखवण्यास सुरूवात केली. त्यामुळे जाग्या झालेल्या पाकिस्तानच्या वतीने सारवासारव करण्यास त्या देशाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते पुढे सरसावले. मोदींकडून चर्चेचा प्रस्ताव आल्याचे कुरेशी यांनी म्हटले नाही. विधायक कृतीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पुढे जाऊ शकतात, असे मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाठवलेल्या पत्रात म्हटल्याचा उल्लेख कुरेशी यांनी केला, असे प्रवक्‍त्याने म्हटले. एवढेच नव्हे तर, चुकीचे वृत्त दिल्याचे खापर त्या प्रवक्‍त्याने प्रसारमाध्यमांवर फोडले.

वाद निर्माण करणे आणि वातावरण दूषित करणे चुकीचे ठरून जबाबदार पत्रकारितेच्या विरोधातील ठरेल, असे प्रवक्‍त्याने नमूद केले. मोदींच्या पत्रामुळे आनंदाचे भरते आलेल्या पाकिस्तानकडून आधी चर्चेच्या प्रस्तावाबाबतचा दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)