पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताची नवी योजना

रोहतक:  केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच उत्तराखंडमधील तीन नद्यांवर धरणे बांधून पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्यात येणार आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते हरियाणाच्या रोहतक येथील कृषी मेळाव्यात बोलत होते.

उत्तराखंडमधून वाहणाऱ्या या तीन नद्यांचे पाणी  पाकिस्तानला द्यायचे की नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. परंतु, सध्या आपल्या विकासासाठी गरजेचे असलेले या नद्यांतील पाणीही पाकिस्तानात जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे पाणी धरणांद्वारे रोखून ते पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये वळवण्याचा निर्णय घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या या विधानाचे उपस्थित शेतकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

फाळणीच्यावेळी भारताच्या वाट्याला तीन नद्या आल्या. मात्र, तेव्हापासून भारताने आपल्या वाट्याचे पाणी पूर्णपणे कधीच वापरले नव्हते. त्यामुळे आता सरकारने उत्तराखंडमध्ये तीन धरणे बांधून भारताच्या हिश्श्याचे पाणी अडवायचे ठरवले आहे. हे पाणी यमुना नदीतून हरियाणा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांपर्यंत पोहोचवले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला हे उद्दिष्ट काही करून साध्य करायचे आहे. त्यामुळे या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)