पाकिस्तानची करतारपूर कॉरिडॉर खुला करण्यास संमती 

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने करतारपूर कॉरिडॉर खुला करण्यास संमती दिली आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त करतारपूर कॉरिडोर खुला करणार असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी जाहीर केले आहे.

करतारपूर येथे जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी करतारपूर कॉरिडॉर खुला करण्याची भारत सरकारने विनंती केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने ही घोषणा केली आहे. करतारपूर येथे गुरू नानक देव यांनी आपल्या जीवनाची अखेरची 18 वर्षे निवास केला होता आणि त्यांनी अखेरचा श्‍वासही करतारपूर येथेच घेतला.
पंजाबच्या गुरुदासपूरमधील बाबा नानक डेरापासून ते करतारपूरपर्यंत कॉरिडॉरसाठी शीख समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. 28 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कॉरिडॉर सुविधांची सुरुवात करतील. या पवित्र उत्सवासाठी शीख समाजाचे आम्ही स्वागत करतो, असे कुरेशी यांनी ट्‌विट केले आहे.

-Ads-

शीख समाजाच्या भावनांचा विचार करून पाकिस्तान सरकारने करतारपूर कॉरिडॉर तयार करावा यासाठी परराष्ट्र विभागाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी पाकिस्तान सरकारशी संपर्क साधला होता. त्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व मुद्‌द्‌यांवर चर्चा करण्यासाठी लिखित प्रस्ताव मांडला, पण भारत सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही, असे पाकिस्तान परराष्टृा विभागाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने 3,838 शीख यात्रेकरूना व्हिसा जारी केल्याचे त्यांनी म्हट्‌ले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)