पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत

इस्लामाबाद – पाकिस्तानी अर्थव्यवस्था गंभीर वळणावर असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सांगण्यात आले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अल्प मुदतीसाठी सकारात्मक पावले उचलण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या वित्तीय तुटीमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानच्या जीडीपीच्या तुलनेत वित्तीय तूट 5.5 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. यापूर्वी पाक सरकारने ती 4.1 टक्‍क्‍यांपर्यंत राहील असे म्हटले होते.

पाक सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने आर्थिक संकटात वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पाकिस्तानने आर्थिक विकास दर 6 टक्‍क्‍यांवर पोहोचेल असे भाकित केले होते, मात्र प्रत्यक्षात 5.6 टक्‍क्‍यांवर स्थिरावला आहे. वित्तीय तूट मर्यादित ठेवणे आणि विदेशी चलनाचा साठा वाढविणे, देशाच्या कर्जाच्या परतफेडीबाबत काही प्रमाणात धोका असल्याचे नाणेनिधीकडून सांगण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील खर्च वाढत असून कर्जाबाबत तत्काळ पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)