पाकिस्तानचा अंडर-१९ चा संघ सोशल मीडियात ट्रोल

नवी दिल्ली : हेगले ओव्हल मैदानात झालेल्या अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा २०३ धावांनी विजय झाला आणि भारताने आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले. यात शुभमन गिलचे शतक, सामनावीर पृथ्वी शॉ यांच्या दमदार खेळीमुळे या विजयाला आपण गवसणी घातली.
५० ओव्हरमध्ये ९ विकेट घालून २७२ रन्स केले. मात्र हे लक्ष्य पाकिस्तानी टीम गाठू शकली नाही. २९.३ ओव्हर्समध्ये ६९ रन्सवर पाकिस्तानी टीमचा खेळ खल्लास झाला. दरम्यान, २०३ धावांनी पराभूत झालेल्या पाकिस्तानी टीमची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली. लोकांनी पाकिस्तानी टीमला खूप ट्रोल केले. या सामन्यात पाकिस्तानचा कोणताही खेळाडू १८ हुन अधिक रन्स करू शकला नाही. त्यामुळे मर्यादा धावांची नसून वयाची होती, असे म्हणून त्यांना ट्रोल करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)