इस्लामाबाद – पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने 18 भारतीय मच्छिमारांना अटक केली. त्यांनी आमच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. त्या मच्छिमारांना मंगळवारी पकडण्यात आले. त्यांच्या दोन नावाही जप्त करण्यात आल्या.

अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांची रवानगी कराचीमधील तुरूंगात करण्यात आली. तिथे आधीपासूनच अनेक भारतीय मच्छिमार कैदेत आहेत. भारत आणि पाकिस्तानकडून परस्परांचे नागरिक असणाऱ्या मच्छिमारांना अटक केल्या जाण्याच्या घटना वारंवार घडतात. तुरूंगवासाची मुदत संपल्यानंतर किंवा दोन्ही देशांनी सदिच्छा कृती केली तरच त्यांची सुटका होते.

याआधी पाकिस्तानने सदिच्छेचे पाऊल उचलताना 14 ऑगस्टला 26 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. पाकिस्तानकडून अटक केले जाणारे मच्छिमार प्रामुख्याने गुजरातचे रहिवासी असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)