संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गुरुवारी गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे.

पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ ला जम्मू-काश्मीर दौऱ्यावर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)