पाकिस्तानकडून राजौरी भागात गोळीबार

जम्मू – पाकिस्तानने जम्मू काश्‍मीरच्या राजौरी भागात आज शस्त्रसंधीचा भंग करून गोळीबार केला. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही प्रतिगोळीबार करून प्रत्युत्तर दिले. तथापी त्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टर मध्ये सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी बाजूकडून हा गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरू झालेली चकमक दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहिली. पाकिस्तानने या वर्षी जम्मू च्या राजौरी आणि पुंछ जिल्ह्याच्या ताबा रेषेवरच लक्ष केंद्रीत केल्याचे लक्षात आले आहे. या वर्षी पाकिस्तानकडून 1 ऑगस्ट पर्यंत आत्तापर्यंत 285 वेळा शस्त्रसंधीचा भंग झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)