पाकिस्तानकडून धार्मिक विद्वेष पसरवला जातोय – राजनाथ सिंह

पटना – पाकिस्तानकडून वारंवार धार्मिक विद्वेष पसरवला जात असून, त्यांचा भारताला तोडण्याचा डाव असल्याची टीका गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. ते पुढे म्हणाले   सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. पाकच्या या कुटील कारस्थानाची काळजी करू नका कारण त्यांना पुन्हा जागेवर आणण्याची आपल्यात धमक आहे.ते बिहारमधील पटना येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

पाकिस्तानला इशारा देताना राजनाथ म्हणाले की, देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करु नका. कारण, भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी बलिदान दिले तसेच अश्फाकउल्लाह खान यांनी देखील भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. पाकिस्तानकडून कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही देशाचे शिर कधीही झुकू देणार नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)