पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांविरोधात पाकिस्तानचे जलयुद्ध

पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांबाबत पाकिस्तानचा दूजाभाव 
पेशावर (पाकिस्तान): शेजारी राष्ट्रांशी वैर धरणाऱ्या पाकिस्तानने पाकव्याप्त काश्‍मीरच्या जनतेबाबतही दूजाभाव धरल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात तर पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांविरुद्‌ध पाकिस्तानने जलयुद्धच पुकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेची जीवनरेखाच असणाऱ्या नीलम नदीचे पाणी पंजाबकडे वळवण्यात आलेले आहे. या एका योजनेद्वारे मुजफ्फराबादच्या लोकांना नीलम नदीच्या पाण्यापासून वंचित करण्यात येत आहे.
नीलम नदीचे पाणी पंजाब प्रांताकडे वळवल्यामुळे पावसाळ्यातही नदी कोरडी पडत आहे. याच्या विरोधात संपूर्ण मुजफ्फरनगरमध्ये आंदोलन सुरू करण्याची वेळ आल्याचे एका मुजफ्फरनिवाश्‍याने सांगितले. नदीचा प्रवाह बदलण्यामुळे आणि नीलम हायड्रो प्रोजेक्‍टमुळे प्रदूषण वाढत असल्याचेही उघड करण्यात आले आहे. नीलम नदीवरील हायड्रो पॉवर प्रोजेक्‍टमुळे पाकिस्तान सरकारला 50 अब्ज रुपयांची कमाई होणार आहे, पण त्यातील किती वाटा पाकव्याप्त काश्‍मीरसाठी खर्च होणार आहे? असा प्रश्‍न करून आम्ही मुजफ्फराबाद अणि पाकव्याप्त काश्‍मीरसाठी मोफत विजेची मागणी करत आहोत असे पाकव्याप्त काश्‍मीरमधील नागरिकांनी म्हटले आहे. सध्या पाकव्याप्त काश्‍मीरमधील जनतेकडून चौपट दराने वीजबिल आकारले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)