पाकवर चीनची नजर; पाकिस्तानमध्ये पाच लाख चीनी नागरिकांसाठी घरे बांधणार

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये चीन आपली वस्ती बनवत आहे. पाकिस्तानच्या ग्वादर शहरामध्ये ५ लाख चीनी नागरिकांसाठी एक वेगळे शहरच चीन बनवत आहे. यामध्ये केवळ चीनी नागरिकच राहू शकणार आहेत. याप्रकारचे शहर दक्षिण आशियाई देशांमधील पहिले शहर असेल. चीनने याआधी आफ्रिका आणि मध्य आशियामध्ये अशा प्रकारच्या कॉलनी बनविल्या आहेत.

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरीडोर (CPEC) योजनेमधून चीन पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये जवळपास १५ कोटी डॉलर खर्च करून चीनी नागरिकांसाठी शहर बनवीत आहे. यासाठी चायना-पाक इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने ग्वादरमध्ये ३६ लाख स्क्वेअर फुट जमीन खरेदी केली आहे. शिवाय चीनने पाकिस्तानमधील पाईपलाईन रेल्वे, हायवे, मोबाईल नेटवर्क, पॉवर प्लांट, औद्योगिक वस्ती यामध्येही गुंतवणूक केली आहे. २०२२ सालापर्यंत हे शहर बनून तयार होईल. यामध्ये केवळ चीनी नागरिकांनाच राहता येणार आहे. हे चीनी नागरिक पाकिस्तानमधील आर्थिक जिल्ह्यांमध्ये काम करणार आहेत.

दरम्यान, याआधीही चीनने रशिया आणि उत्तरी म्यानमारमध्ये जमिनी घेण्याचा प्रयत्न केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)