पाकला अमेरिकेचा दणका : 300 दशलक्ष डॉलरची मदत रोखण्याचा निर्णय

वॉशिंग्टन – पाकिस्तानला देण्याची 300 दशलक्ष डॉलरची मदत रोखण्याची मागणी अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉनने तेथील संसदेकडे केली आहे. अमेरिकेच्या दक्षिण आशिया धोरणानुसार पाकिस्तानने निर्णायक कृती न केल्याने ही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 323.6 दशलक्ष डॉलरपैकी 300 दशलक्ष डॉलरची मदतीची संरक्षण मंत्रालयाकडून जून जुलै 2018 साठी फेररचना करण्यात आली आहे. या निधीची मुदत 30 सप्टेंबर 2018 रोजी संपणार आहे, असे पेंटॅगॉनचे प्रवक्‍ते कोन फॉल्कनर यांनी सांगितले. पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या या निधीबाबतचा निर्णय जुनाच आहे. मात्र त्याची घोषणा नव्याने करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संरक्षण मंत्रालयाच्या अॅप्रोप्रिएशन अॅक्‍ट 23 मार्च 2018 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये 500 दशलक्ष डॉलरच्या तरतूदींबाबत फेररचना करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात विशेषतः हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कवर निर्णायक कारवाई करावी यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयाला संसदेची मान्यता मिळणे बाकी आहे. या मदत कार्यक्रमाच्या फेररचनेबाबतची विनंती संसदेकडे करण्यात येणार आहे. ही मंजूरी 30 सप्टेंबर पूर्वी मिळणे अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)