पाकमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याची सुरक्षा मंडळ सदस्यांना खात्री

अफगाणिस्तानचे संयुक्तराष्ट्राकडे दावा आता कडक कारवाईची मागणी
वॉशिंग्टन – पाकिस्तान मध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय दिला जात असल्याची खात्री सुरक्षा मंडळातील सदस्य देशांना पटली आहे त्यामुळे संयुक्तराष्ट्रांनी आता त्याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी अफगाणिस्तानने केली आहे. अफगाणिस्तानचे संयुक्तराष्ट्रांतील प्रतिनीधी मेहमुद सईकल यांनी पाकिस्तानचे नाव न घेता ही मागणी केली. या संबंधातील पुरावे आम्ही संयुक्‍तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाला दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

अशा देशांच्या विरोधात सुरक्षा मंडळाच्या ठरावानुसार आता ठोस कारवाई झालीच पाहिजे असे त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की सुरक्षा मंडळाचे सदस्य असलेल्या पंधरा राष्ट्रांचे राजदूत पातळीवरील एक शिष्टमंटळ अलिकडेच काबुल भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष तेथील स्थितीचा अभ्यास केला आहे. त्यानंतर काहीं दिवसांनी त्यांनीच पाकिस्तानात दहशतवाद्यांन आश्रय दिला जात असल्याची आमची खात्री पटली आहे असे म्हटले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-Ads-

यापैकी एकाहीं देशाने ही बाब नाकारल्याचे आपल्या ऐकिवात आलेले नाहीं असे सईकल यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. पण आता आमचे तेवढ्याने समाधान होणार नाही. तेथे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत ही खात्री जर त्यांना पटली आहे तर त्यांनी त्यावर ठोस कारवाई केली पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)