पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा राजीनामा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासेर जांजुआ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हंगामी पंतप्रधान नासिरुल मुल्क यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात आला आहे.

हंगामी पंतप्रधानांबरोबर काम करण्याविषयी ते नाखूष होते त्यातून त्यांचे अनेकदा खटके उडत असत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तथापी जांजुआ यांनी आपल्या राजीनाम्याचे नेमके कारण मात्र अजून स्पष्ट केलेले नाही. जांजुआ यांनी लष्करात कार्यरत असताना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इस्लामाबाद येथील नॅशनल डिफेन्स युनिर्व्हसिटीचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)