पाकच्या मदतीला धावला सौदी अरेबिया 

6 अब्ज डॉलर्सची मदत केली जाहीर 
इस्लामाबाद: प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला सौदी अरेबिया हा देश धावला आहे. त्या देशाने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सची मदत देऊ केली आहे. अंतर्गत आर्थिक पेच प्रसंगामुळे सध्या पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागण्यात आली आहे. त्याविषयी सध्या अजून केवळ चर्चाच सुरू असल्याने तातडीची मदत म्हणून सौदी अरेबियाने त्यांना ही रक्कम कर्ज स्वरूपात दिली आहे.
सौदी अरेबियाने आयोजित केलेल्या गुंतवणुक परिषदेच्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी केलेल्या विनंतीनुसार सौदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या परिषदेवर अन्य देशांनी बहिष्कार टाकला आहे. पत्रकार खाशोगी हत्या प्रकरणात सौदी सरकारचा हात असल्याचा आरोप होत असल्याने अन्य देशांनी या परिषदेवर बहिष्काराची घोषणा केली होती पण इम्रानखान मात्र त्याला आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीचा पाकिस्तानला असा लाभ झाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)