पाकच्या पहिल्या महिला विदेश सचिव रूजू

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या विदेश सचिव पदावर तेहमीना जांजुआ यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनीव्हा कार्यालयात पाकिस्तानच्या कायम प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. विद्यमान विदेश सचिव एझाज अहमद चौधरी यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी जांजुआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती जांजुआ यांना परराष्ट्र सेवा विभागातील तब्बल 32 वर्षांचा अनुभव आहे. त्या 1984 पासून तेथे कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)