पाकच्या निमलष्करी दलावर तालिबानी हल्ला ; दोन ठार

पेशावर – पाकिस्तानी तालिबानी संघटनेच्या एका आत्मघाती हल्लेखोराने आज तेथील निमलष्करी दलाच्या एका वाहनावर हल्ला केला त्यात दोन जवान ठारा झाले तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्या दोन जणांमध्ये एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.

उत्तरपश्‍चिमी पाकिस्तानात हयाताबाद भागात हा प्रकार घडला. फ्रंटिअर कॉन्टॅब्लरीच्या वाहनाच्या एका ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली मोटारसायकल धडकाऊन हा हल्ला करण्यात आला. निमलष्करी दलाच्या वाहनांच ताफा तेथील ट्रॅफिक सिग्नलला थांबलेला असतानाच ही मोटारसायकल त्यातील एका वाहनावर नेऊन धडकावण्यात आली. त्यात दोन जण जागीच ठार झाले. अन्य काही जण जखमी झाले. त्यात त्या परिसरातून जाणऱ्या काही नागरीकांचाही समावेश होता. या स्फोटात निमलष्करी दलाची दोन वाहने नष्ट झाली आहेत.

तहरीक ए तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कालच पाकिस्तानी लष्कराने खैबर अदिवासी भागातील इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्‍यांना नेस्तानबूत करण्यासाठी मोहीम उघडण्याची घोषण केली होती त्या पार्श्‍वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)