पाकच्या आयएसआय संस्थेच्या माजी प्रमुखांवरील कारवाईला कोर्टात आव्हान 

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल असद दुर्रानी यांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली असून त्यांना देशाबाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांनी स्वताच या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे. त्यांनी भारताच्या माजी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखांबरोबर त्यांनी संयुक्तपणे एक पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकावरून सध्या तेथे वादंग निर्माण झाल्याने पाक सरकारने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
दुर्रानी हे ऑगस्ट 1990 ते मार्च 1992 या अवधीत आयएसआय या संघटनेचे प्रमुख होते त्यांनी निवृत्त झाल्यानंतर भारताच्या रॉ या गुप्तचर संघटनेचे प्रमुख ए. एस. दुलत यांच्या बरोबर द स्पाय क्रॉनिकल्स: रॉ, आयएसआय ऍन्ड इल्युजन ऑफ पीस इन इंडिया या नावाचे पुस्तक लिहीले आहे. त्यानंतर त्यांच्यावर मे महिन्यात विदेशात प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. आपल्याला एका परिषदेच्या निमीत्ताने विदेशात जाणे अगत्याचे आहे तसेच आपल्या विदेशात राहणाऱ्या नातवांनाहीं आपल्याला भेटायला जायचे आहे त्यामुळे आपल्यावरील ही बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी इस्लामाबाद हायकोर्टात दाखल केलेल्या आव्हान याचिकेत केली आहे. या दोन्ही गुप्तहेर प्रमुखांनी आपल्या पुस्तकात दहशतवाद, मुंबईवरील हल्ला, काश्‍मीर प्रश्‍न आणि गुप्तचर संघटनांचा प्रभाव इत्यादी संवेदनशील विषयावरही भाष्य केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)