पाकचे बापू जीन्ना आणि नवाज मुन्ना 

– धनंजय 

स्थळ – इस्लामाबाद वेळ – पश्‍चात्ताप करण्याची 
‘होय, मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी आमचेच होते ‘असा आत्मघातकी कबुलीजबाब देऊन’ मुन्नाभाई नवाज हे आपल्या महालात परतले. दहा ट्रक आरडीएक्‍सचे वजन डोक्‍यावरून कमी झाल्यासारखं वाटल्याने मुन्नाभाई नवाज हे खुशीत आले व फ्रिज चे दार उघडून सरबते आजम रूह अफजा ची बाटली काढली. ग्लासमध्ये सरबत ओतणार इतक्‍यात दालनाच्या खिडकीतून दैदिप्यमान प्रकाश आला व पाठोपाठ एक आकृती अवतरली. भीतीने मुन्ना नवाज गर्भगळीत झाले, हातपाय लटलट कापू लागले.”हाफिजभाई तो नही’ या आशंकेने हार्टबीट्‌स वाढले. उपरवाल्याला याद केले व डोळे गच्च मिटले.

‘कैसे हो मुन्ना नवाज बेटा?’
‘कौन? मुझे बेटा कहनेवाला कौन माईका लाल है?’नवाज भाई चिडूनच म्हणाले.
‘अरेरे! मी मोहम्मद अली जिन्ना, “फादर ऑफ पाकिस्तान.’ नवाजभाईचा गळा भरून येतो
‘जिन्नाबापू, आय मीन अब्बु. सही वक्त पर आये आप. एवढ्या वर्षानंतर कसे आलातं?’
‘इथे कुणाला याद येवो न येवो, अलिगढ युनिवर्सिटीमध्ये माझी तसबीर हटवण्यावरून राजकारण झाले व मला कबरी बाहेर यावे लागले, मुन्नाभाई. अरे क्‍या हालत बना रखी है मुल्क की? पण मुंबई हल्ल्‌याची जबाबदारी घेण्याचे धाडस तू दाखवलेस अन मी धन्य झालो’.

‘जीन्ना अब्बु, आता माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच उरले नाही. जगभरातील नेते एकीकडे पॉवरफुल बनत असताना माझे मात्र पानिपत झाले आहे. चीनचे जिनपींग तहहयात राष्ट्राध्यक्ष झाले, ब्लादमीर पुती, डोनाल्ड ट्रंप पाहा, शेजारचे नरेंद्रभाई, उत्तर कोरियाचे किम जोंग. मी मात्र कमनशिबी. मला तहयात राष्ट्राध्यक्ष होता येणार नाही आता. हेच फळ काय मम तपाला? म्हणून हिंमत केली अन कन्फेशन केले की मुंबई हल्ला आमच्याच लोकांनी केला.’
‘वा, सत्यमेव जयते! तुझे नाव सुवर्णाक्षरात लिहावे लागेल पाकिस्तानच्या इतिहासात .’

‘सॉरी जिन्ना अब्बु , खोटी आशा दाखवू नका , अहो आपली जनता अहसान फरामोश आहे , अजून तुमचे नाव सुद्धा सुवर्णाक्षरात लिहिले नाही आम्ही तर माझा नंबर कधी लागेल अब्बु?’
‘ पण तरी एका गोष्टीची दाद तर द्यावीच लागेल. जे मला जमले नाही ते तू करून दाखवले. फाळणीचे कन्फेशन करण्याची हिंमत मी असेपर्यंत मला झाली नाही. माझ्या मनावरचे ओझे घेऊनच मी या जगाचा निरोप घेतला. मात्र तू चुक कबुल करून एक पाऊल पुढे टाकलेस. खुदा हाफिज!’
‘कुठे निघाला फादर ऑफ नेशन? ‘
‘एक आणखी मुन्ना आहे, त्याला ही भेटावे म्हणतो. त्याची नाराजी परवडणारी नाही. हाफिज सईद, मुन्ना हाफिज! माझे दुर्दैव जे अशा लोकांचा जन्म होण्यास मी कारणीभूत ठरलो. गत जन्मीचे पाप माझे, दुसरे काय ?’ जिन्ना अब्बु कसंनुसं हसतात. मुन्ना नवाज पण हसण्याचा अभिनय करतो व “फादर ऑफ नेशन’चा निरोप घेतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)