पाकचे जनरल स्वतःच्याच लोकांना ठार करतात-शौकत अली कश्मिरी

लाहोर : पाकव्याप्त काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ता शौकत अली कश्मिरी यांनी पाकिस्तानच्या जनरलविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानचे जनरल आपल्याच देशातील लोकांना जीवे मारतात, तसेच त्यांच्याकडे स्वतःची सैन्य तुकडी असल्याचे कश्मिरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या खुलाशाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानी जनरलचे प्रतिनिधी असतात असे देखील कश्मीरी यांनी म्हटले आहे. दरम्यान, असे होण्यामागे देखील असणाऱ्या कारणाची माहिती त्यांनी दिली आहे. मागील काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये पश्तनू समुदायाचे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत असून ते चिरडण्यासाठी पाक सरकार पश्तनु लोकांना जीवे मारत आहे. त्यामुळे इथल्या सरकारच्या विरोधात बंड पुकारण्यात येत आहे.  दरम्यान, पश्तनु समुदाय हा पाकमधील अत्यंत गरीब आणि मागास समुदाय आहे.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)