पाकचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने पाडला हाणून; दोन ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराला मोठे यश हाती आले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानी गणवेश परिधान केलेल्या दोन घुसखोऱ्यांना कंठस्नान घातले. तसेच घुसखोऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे घुसखोर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बॅट) सदस्य होते. व भारतीय लष्कराविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत ते होते.

माहितीनुसार, घुसखोर भारतीय सीमेत प्रवेश करत असताना त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत दोन्ही घुसखोरांना कंठस्नान घातले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचे चिन्ह आहे. तसेच घुसखोरांनी युद्धात घालण्यात येणारे कपडे परिधान केले होते. तर काहींनी बीएसएफ आणि भारतीय लष्कराच्या जुन्या गणवेशासारखेही कपडे परिधान केले होते.

दरम्यान, या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)