पाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली 

इस्लामाबाद – करतारपूर कोरिडोर भूमिपूजनाप्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांती, मैत्रीपूर्ण संबंध आणि प्रगती विषयी बोलून केवळ २४ तासच उलटले आहेत. आणि यामागील पाकिस्तानचा खरा हेतू पाकिस्तानच्याच मंत्र्यांनी स्पष्ट केला आहे. करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची एक गुगली होती, असे पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी  यांनी म्हंटले आहे. इम्रान खान सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

शाह महमूद कुरैशी यांनी आपल्या भाषणात अफगाणिस्ताननंतर भारताला दुसरा महत्वपूर्ण शेजारी सांगितले आहे. ते म्हंटले कि, करतारपूर कोरिडोर भूमिपूजन कार्यक्रमामध्ये भारत सरकारला निमंत्रित करणे ही तर इम्रान खान यांची गुगली होती. आणि यामध्ये मोदी सरकार क्लीनबोल्ड झाली. कुरैशी यांच्या भाषणावेळी इम्रान खानही त्याठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान, करतारपूर कोरिडोर भूमिपूजन कार्यक्रमात भारताकडून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप पुरी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)