84 टक्के नोंद : 9 जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पर्जन्य

पुणे – राज्यात गेल्या अडीच महिन्यांत 84 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हावार पावसाचा अहवाल नुकताच कृषी विभागाने जाहीर केला आहे. सर्वांत कमी पाऊस हा सोलापूर आणि औरंगाबाद विभागात झाला आहे. तर, 9 जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे.

राज्यात जूनमध्ये पावसाने उघडीप दिली. जुलैमध्ये पहिले तीन आठवडे पाऊस झाल्यानंतर पुन्हा विश्रांती घेतली. तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे साधारणत: 12 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने 16 ऑगस्ट पर्यंतचा राज्याचा पावसाचा अहवाल जाहीर केला आहे. दरम्यान, पावसाळा संपण्यासाठी आणखी दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस सरासरी गाठेल, अशी चिन्हे आहेत.

पीक नुकसानीची आकडेवारी नाही
राज्यात सध्या मात्र सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. तर अति पावसामुळे काही ठिकाणी पिके वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. पाऊस अजून सुरू असल्याने याची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध झालेली नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)