“पाऊस गाणी’मध्ये रसिक ओलेचिंब

पिंपरी – “”तू हसतेस तेव्हा तो कोसळून जातो, खिडकीत आठवांचा दंगा करुन जातो” ही रचना आहे, गझलकार दिनेश भोसले यांची. या आणि अशाच पावसावर आधारित विविध काव्यरचनांच्या वर्षावात रसिक ओलेचिंब झाले.

निमित्त होते, पाऊस गाणी या कार्यक्रमाचे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि प्रतिभा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ओल्याचिंब मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड स्टेशन येथील प्रतिभा महाविद्यालय सभागृहात आयोजित या मैफलीच्या अध्यक्षस्थानी उद्योजक कैलास आवटे होते. “”धो धो पाऊस आला, घेऊन संगे वारा, इकडून तिकडे धावत, घालतो हा धिंगाणा” ही कविता शशिकला देवकर यांनी सादर केली. “”पृथ्वीवरती लुब्ध होऊनी आकाश करते वेशभूषा” या रचनेतून हेमंत जोशी यांनी आभाळातून पडणाऱ्या पावसाचे पृथ्वीशी असलेले नाते उलगडून दाखवले. आय. के. शेख यांनी “”पावसा तुला नाही का वाटत रेनकोट घालावा?” असा प्रश्न आपल्या कवितेतून पावसालाच विचारला. रघुनाथ पाटील यांनी “”जळे आभाळ काय उपाय, खंगून गेली माय” ही वेगळी रचना सादर केली.

-Ads-

मधुश्री ओव्हाळ यांनी “”दुष्काळालाच पळवून लावूयात…” असे आवाहन आपल्या काव्य रचनेतून केले. “”टीप टीप जलधारा, सांगे धरतीला” या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या कवितेला रसिकांची भरभरुन दाद मिळाली. अपर्णा मोहिले, संगीता व्होरा, बाबू डिसोझा, डी. बी. शिंदे, सीमा गांधी, अनघा पाठक, शीला देशपांडे, सुभाष चव्हाण, नागेश गव्हाड, भाऊसाहेब गायकवाड आदींनी विविध कविता सादर केल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे उपस्थित होत्या. माधुरी डिसोझा, वसंत गुजर, समीर सुर्यवंशी, उषा गर्भे, धैर्यशील पवार या रसिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विनिता श्रीखंडे आणि पुष्पा नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक अमोलिक यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)