पाईट-आंबोलीत अवैध धंद्यांना ऊत

कारवाई होत नसल्याने उलट सुलट चर्चांना उधान

पाईट- पाईट-आंबोली परिसरात अनेक अवैध धंद्यांना ऊत आला आहे. खेड-वांद्रा व चाकण-वांद्रा रस्त्यालगत अनेक अवैध धंद्यांनी आपले बस्तान बसवले आहे. रस्त्यालगत खुलेआम अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याने या व्यावसायिकांचे जाळे दिवसेंदिवस भक्कम होत आहे. तर पोलीस प्रशासन यावर कोणतीच कारवाई करीत नसल्याने यामागे काय रहस्य आहे याचे कोडे सर्वसामान्य नागरिकांना सुटत नसल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दारू, गुटखा, जुगार, पेट्रोलियम घटक याबरोबरच अनेक अनधिकृत चायनीजच्या हॉटेल व तेथे चायनीज खाण्याबरोबरच पिण्यासाठी विविध प्रकारच्या दारू ठेवल्या जातात. यामुळे या परिसरात भांडण-तंट्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या रस्त्यांच्याकडेला तळीरामांचे अनेक अड्डे बनल्यामुळे रस्त्यांवरून रहदारी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून अवैध व्यवसाय बंद करण्याची नागरिक करीत आहेत.
खेड-वांद्रा व चाकण-वांद्रा रस्त्यालागत अनेक अवैध व्यवसायिकांनी आपले धंदे खुलेआम सुरू केले आहेत. पोलीसही हे सर्व धंद्यांकडे जाणून-बुजून डोळेझाक करतात, यामुळे या व्यावसायिकांना कोणाचेही भय वाटत नाही. राजकीय पुढाऱ्यांचे व चिरीमिरीचा वरदहस्त लाभत असल्याने या व्यवसायांच्या दादागिरीचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात दिसून येते. याचा सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागतो. या व्यावसायिकांची दहशत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यामुळे “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी गत झाली आहे.
या रस्त्यांच्या लागतच अनेक प्राथमिक शाळा, विद्यालये आहेत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करतानाही विदारक दृश्‍ये दिसत असल्याने त्याच्या बालमनावर वाईट परिणाम होण्याची शक्‍यता आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास झाल्याने कामानिमित्त ये-जा करणाऱ्या पुरुष तसेच महिला कामगारांना या सर्व गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधितांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे.

  • आमची मुले शाळेत जाताना येताना या मद्यपींकडून अनेक वेळा अर्वाच्य भाषेचा सामना करावा लागत असल्याने त्यांना रस्त्याने जाण्याची भीती वाटत, त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही असा प्रश्‍न पडतो.
    – कैलास शिंदे, पालक, आंबोली
  • पोलीस प्रशासनाला वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी वेळ लागत असल्याने लक्ष द्यायला वेळ नाही जसा वेळ मिळेल तशी कारवाई केली जाईल.
    – सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)