पाईटमध्ये रंगला तांबड्या मातीतला रांगडा खेळ

पाईट- खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील सर्वात मोठी यात्रा पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान नवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवाचे औचित्य साधून पाईट येथे निकाली कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या तांबड्या मातीत मर्दानी खेळ असलेल्या कुस्त्यांचा फड रंगला आणि शड्डांचे आवाज पट, कोल्या, दसरंग, ढाक, कालाजंग, बांगडी, स्वारी, आतली-बाहेरची लांग इत्यादी डाव-प्रतिडावांचे सुरेख प्रदर्शनाने पंचक्रोशीतल्या तमाम कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
याबाबत पाईट गावचे नवनाथ दरेकर म्हणाले की, चैत्र शुद्ध 12 या दिवशी येथील ग्रामदैवत नवखंडेनाथ महाराजांचा उत्सव दरवर्षी होत असतो. यावेळी सकाळी 8 ते 9 या वेळेत देवीच्या मूर्तीस अभिषेक झाला. दुपारी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा दुपारी अडीच वाजता सुरू झाला. यावेळी काका पवार तालीम पुणे, मोतीबाग तालीम कोल्हापूर, आगरवाल तालीम पुणे, मामासाहेब मोहळ तालीम, वारू, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर हवेली, पाथर्डी, पाटण तालुक्‍यातून मोठ्या संख्येने पैलवान आले होते. या आखाड्यात पंच म्हणून शरद चोरघे, प्रभू रौनधळ, शरद करंडे, मारुती चोरघे यांनी काम पाहिले.
मनोरंजनासाठी मंगला बनसोडे आणि उषा पाटील लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीधर दुबे, तहसीलदार दिगंबर भेगडे, सुभाष डांगले, बकवंत डांगले, पंडित रौनधळ, रामदास सावंत, महादू डांगले, अनंथा करंडे, रामदास खेंगले, अंकुश दरेकर, नंदू साळुंखे, शंकर खेंगले, किरण चोरघे, हिरामण रौंधळ, अकबर इनामदार, कबीर रौंधळ, भरत खेंगले, दत्ता रौंधळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश दरेकर आणि रामदास खेंगले यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)