नगर – शेतातील पाईपलाईनच्या कारणावरून बाबुर्डी बेंद येथे हाणामारी ची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि फिर्यादी गणेश प्रल्हाद चोभे(रा.बाबुर्डी बेंद ता.जि.अ.नगर) यांच्या दि. 26 मे रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी मनोज उर्फ दत्तात्रय बाजीराव चोभे याच्या सांगण्यावरून जेसीबी वरील ड्रायव्हर उसाच्या शेतातील पाईपलाईन उकरतांना दिसला यावेळी फिर्यादीने पाइपलाइन खोदु नको असे म्हणत काम बंद केले. यावेळी जेसीबी ड्रायव्हरने मनोज चोभे याला तेथे बोलावून घेतले. यावेळी बाबुर्डी बेंद येथील शेतात आरोपी मनोज चोभे , तात्या अशोक चोभे, बाजीराव माधव चोभे(सर्व राहणार बाबुर्डी बेंद,ता.जि.अ.नगर) यांनी शेतात येवून फिर्यादीस तुला काय करायचे असे म्हणत शिवीगाळ करत जेसीबी तील लोखंडी टॉमीने डोक्‍यास व पायाला मारहाण केली. व परत आमच्या नादी लागला तर तुला जीवे मारून टाकु अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीने आरोपींविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक एस.एस.सावंत या करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)