पांढरेवाडी-कुरकुंभ रस्त्याची झाली चाळण

कुरकुंभ- पांढरेवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. हे खड्डे मोठे असल्याने खड्डे चुकविताना छोटे मोठे अपघात घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कुरकुंभ पांढरेवाडी ते हिंगणी गाडा येथील बारामती पाटस रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे हिंगणी गाडा वासुंदे रोटी तसेच परिसरातील वाडीवस्ती येथील नागरिक, विद्यार्थी,प्रवासी कुरकुंभ व दौंडला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे.
दौंड हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने दौंडला शासकीय, राजकीय, शालेय या कामासाठी तसेच कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हा रस्ता मोठया प्रमाणात उपयुक्त ठरतो. तसेच कुरकुंभ वरून पांढरेवाडी ते हिंगणी गाडा येथील बारामती पाटस रस्त्याला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे शेती व्यवसाय व दुग्धव्यवसायांसाठी हा रस्ता उपयुक्त ठरत आहे. पण या रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली असल्यामुळे याचा त्रास प्रवासी, व्यावसायिकांना व शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. या रस्त्या वरील साईड पट्ट्या खचल्या असल्यामुळे दुचाकी व चारचाकी या वाहनांचा छोटे मोठे अपघात होत आहेत, असे परिसरातील नागरिक सांगत आहेत आणि गाड्याचेही नुकसान होत आहे. त्यामुळे याचा तोटा शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)