पांढरस्थळ वस्तीतील दारुच्या भट्ट्या जमीनदोस्त

उरुळी कांचन- येथील पांढरस्थळ (डाळिंबरस्ता) वस्तीवर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनविले जाते. तसेच ओढ्याच्या घाण पाण्यापासून हीदारू बनविली जात असल्याची माहिती उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांना मिळाल्यानंतर आज सायंकाळी पाचच्या सुमारास सहा ते आठ दारूच्या भट्ट्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.
दरम्यान, उरुळी कांचन येथील पांढरस्थळ (डाळिंब रस्ता) येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनविले जात असल्याची माहिती उरुळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर चे पोलिस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांना दिली.त्यानंतर हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड व लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन येथील दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, शशीकांत पवार, शिरीष कामठे, अमोल भोसले, संदिप देवकर, मच्छिंद्र भगत, शम्मीन पठाण, सोमनाथ चित्तारे, सचिन पवार या पोलीस पथकाने सुमारे सहा ते आठ भट्ट्या भुईसपाट केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)