पांड्या आणि अश्‍विनकडून अधिक अपेक्षा – संजय बांगर

साऊथहॅम्पटन: भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटीमधिल भारताच्या पहिल्या डावात संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीने केलेल्या निराशेच्या पार्श्‍वभुमीवर भारतीय संघाच्या फलंदाजांचे प्रशिक्षक संजय बांगरयांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्‍विनकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत त्यांनी इतक्‍या सहज आपल्या विकेट फेकायला नव्हत्या पाहिजे त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे त्यांच्या कडून इथुन पुढे चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, भारताने दावात चांगली सुरूवत केली होती भारताची वाटचाल ही चांगली होत होती, मात्र पांड्या आणि अश्‍विनयांनी बेजबाबदार फतके खेळण्याचा प्रय्त्न केला आणि त्याचा तोटा भारतीय संघाला झाला. एक वेळ भारतीय संघ कमीत कमी 100 ते 150 धावांची आघाडी घेइल अशी शक्‍यता वातत होती मात्र या दोघांनी खेळपट्टीवर तग न धरता खराब फटके मारण्याच्या प्रयत्नात स्वताःच्या विकेट फेकल्या. पहिल्या डावात हार्दीकने 4 तर अश्‍विनने 1 धाव केली.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर सर्वांच्या आशा हार्दिक पांड्यावर होत्या कारण चेतेश्‍वर पुजारा चांगली फलंदाजी करत होता. हार्दिकला केवळ खेळपट्टीवर तग धरुन पुजाराला स्ट्राईक देणे इतकेच काम होते. मात्र, हार्दिकने ते न करता बेजबाबदार फटके मारण्यात स्वारस्य मानले आणि तो बाद झाला. तर अश्‍विनने गरज नसताना फटका मारायचा प्रयत्न केला आणि आपली विकेट गमावून बसला. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ 27 धावांचीच आघाडी मिळवता आली.

एकीकडे भारतीय फलंदाज बाद होताना पुजाराने केलेल्या खेळीचे कौतुक करताना बांगर म्हणाले की, पुजाराची खेळी ही अप्रतीम होती, त्याने मैदानावर स्थीरावून कश्‍या प्रकारे खेळायचे याचे उत्तम उदाहरण त्याच्या खेळीतून दाखवून दिले आहे. ज्र पूजाराने चांगली फलंदाजी केली नसती तर भारताला पहिल्या डावात पिछाडीवर रहावे लागले असते आणि त्यामुळे भारतीय फलंदाजांचे मनसीक खच्चीकरण झाले असते. मात्र, पुजाराने आपल्या खेळीतून भारताच्या डावाला एक प्रकारे आकार देण्याचे काम केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)