पांड्याला स्थान मिळते मग करुण नायरला का नाही ?- संदीप पाटील

संघनिवडीवर संदीप पाटील यांची टीका

मुंबई: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केल्यानंतर सुरू झालेला वाद थांबायला तयार नाही. अगोदर सौरव गांगुली व हरभजन सिंग यांनी संघ निवडीवर टीका केली होती. आता त्यात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचीही भर पडली आहे.

-Ads-

करुण नायरला वगळल्याने चहूबाजूंनी टीका होत आहे. माजी निवड समिती प्रमुख आणि माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी बीसीसीआयच्या या संघनिवडीवर कडाडून टीका केली आहे. फ्लॉप ठरलेल्या हार्दिक पांड्याला खेळवता, मग करुण नायरवर अन्याय का, असा सवाल त्यांनी केला. इंग्लंड दौऱ्यात नायरचा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. त्यानंतर वेस्ट इंडीज मालिकेसाठीच्या 15 सदस्यीय संघातूनच त्याचे नाव वगळण्यात आले. त्यावर माजी खेळाडूंनी आश्‍चर्य व्यक्त करताना बीसीसीआयला टार्गेट केले. त्यात पाटील यांनीही सहभाग घेतला. ते म्हणाले, नायरला वगळल्याने मला धक्‍का बसला आहे. संघाबाहेर करण्यासारखे त्याने काहीच केलेले नाही. तो खूप प्रतिभावंत खेळाडू आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असताना मी त्याचा खेळ जवळून पाहिला आहे.

पाटील यांनी नायरवर झालेल्या अन्यायाबाबत बोलताना हार्दिक पांड्याला दिल्या जाणाऱ्या रॉयल ट्रीटमेंट’वर भाष्य केले. ते म्हणाले, तिहेरी शतक झळकावणे, ही नायरची चूक आहे का? मला निवड समितीवर टीका करायची नाही, परंतु निवडीमागचे निकष काय, हे कळत नाही. एका बाजूला तुम्ही पांड्याला पाठीशी घातला आणि दुसरीकडे प्रचंड क्षमता असलेल्या नायरकडे दुर्लक्ष करता हे बरोबर वाटत नाही. यातून बीसीसीआय दुटप्पीपणाने वागत आहे असे वाटते आहे. संधी मिळाल्याशिवाय कोणताही खेळाडू स्वत:ला सिद्ध कसा करणार, असा सवालही त्यांनी केला.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)