पांडेश्वर-सुपे रस्तावर खड्डेच खड्डे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जवळार्जून- सासवड-नाझरे, सुपे-पांडेश्वर-सुपे रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे-झुडपे वाढलेली असून रस्त्याने येता-जाता वाहनचालकांना वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे.
पांडेश्वर, आंबी, खंडूखेरेवाडी, नायगाव, रीसेपिसे व जवळार्जून या गावांना जाण्यासाठी सर्वात जवळचा हा मार्ग असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्यालगत साईडपट्या नसल्यामुळे वाहन रस्त्यावरून खाली घेता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालक व ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्तावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यामधून खोदलेल्या पाईपलाईनमुळे जागोजागी चर पडले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)