पांडेश्वर भागशाळेमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जवळार्जून- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या यशवंत विद्यालयाची भागशाळा पांडेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत 300 वह्यांचे वाटप करण्यात आले. कडेपठार बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुदाम इंगळे, माणिक झेंडे, सुधाकर टेकवडे, जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम इंगळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर टेकवडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, सरपंच वैयाजंता प्रकाश शिंदे, कडेपठार पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक अरविंद शेंडकर, पांडेश्वर विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय जगताप, अशोक नाळे, विट्ठल रोमन, प्रताप रासकर, माणिक नाळे, बंडू नाळे, हनुमंत रोमन, रणजित खारतोडे, प्रशांत माकर, मेघमाला सकुंडे, मोहिनी कापरे, माधुरी दळवी, संजवनी निंबाळकर, सोनाली काळाने, प्रताप विरकर, बाळासाहेब मेमाणे, सागर शितोळे, रामचंद्र जाधव व गणेश सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)