पांडुरंग पादुका पालखी सोहळा पंढरीच्या वाटेवर

आळंदीकरांनी हरिनामाच्या गजरात दिला निरोप : शेजारतीने माउलींच्या समधी सोहळ्याची सांगता

आळंदी- माउलींच्या संजीवन समीधी सोहळा आणि कार्तिक एकादशीनिमित्त श्री पांडुरंगाच्या पादुका पालखी सोहळ्याचे आळंदीत उत्साहत स्वागत करण्यात आले होते. तर आज (शनिवारी) सकाळी हरिनामाच्या गजरात पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला.
पालखी सोहळ्याचा परतीच्या प्रवासात पहिला मुक्काम आणि पाहुणचार शुक्रवारी (दि. 7) थोरल्या पादुका देवस्थानमध्ये झाला. त्यानंतर थोरल्या पादुका येथून आज हरिनाम गजरात पालखी पुण्यनगरीकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, शुक्रवारी माउली मंदिरात रात्री उशिरा पालखीची नगरप्रदक्षिणा छबिना मिरवणूक झाली. तर श्रींच्या 723 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची सांगता शेजारतीने झाली. प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील, विश्‍वस्त अभय टिळक, योगेश देसाई, व्यवस्थापक माउली वीर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, श्रीधर सरनाईक, श्रींचेसेवक रामभाऊ रंधवे चोपदार, बाळासाहेब रणदिवे चोपदार, मालक बाळासाहेब आरफळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, पांडुरंगाच्या पादुकांची पूजा अध्यक्ष विष्णू तापकीर यांच्या हस्ते झाली. तर श्रींच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पालखी सोहळ्याचे मालक विठ्ठल महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर, ज्ञानेश्‍वर महाराज भोसले, गोपाळ महाराज देशमुख आदींचा विष्णू तापकीर यांच्या हस्ते सत्कार झाला. थोरल्या पादुका देवस्थानमध्ये भजन, कीर्तन, आरती, प्रसाद वाटप झाले. श्रींचे पालखीसह वैभवी रथासह सोहळा पंढरी नगरिकडे पुण्यनगरी मार्गे हरिनाम गजरात मार्गस्थ झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)