पांडुरंग पवार यांचा वाढदिवस उत्साहात

आळेफाटा -निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे विविध उपक्रमांनी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. येथील विविध संस्था व ग्रामस्थांच्या वतीने पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप वळसे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण, महाविद्यालया अंतर्गत क्रिकेट स्पर्धा तसेच पांडुरंग पवार मित्र मंडळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमधे प्रथम चार क्रमांकामध्ये आलेल्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 15 हजार, 11 हजार, 9 हजार व 7 हजार अशी रोख रकमेच्या स्वरूपाची बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, अनेक गावांचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)