पांडुरंगासह नामदेवरायीां पालखी आळंदीत दाखल

आळंदी-कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर ते आळंदी पायी प्रवास करीत श्री पांडुरंगाच्या पादुका पालखी, संत नामदेवराय पालखी दिंडी आळंदीत आगमन झाले. नेवासा ते आळंदी पालखी दिंडीचेही आगमन झाले. भाविकांनी आळंदीत दर्शन घेतले. संत नामदेवरायांचा दिंडी पालखी सोहळा आणि नेवासा ते आळंदी श्रीगुरु किसनमहाराज साखरे प्रेरित सुरू केलेला पायी दिंडी पालखी सोहळा हरिनाम गजरात दिंड्यांचे नामगजरात पोहचला. श्री पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख मयुर ननवरे, विठ्ठल महाराज वासकर, विश्वस्त माधवी निगडे, नेश्वर महाराज जळगावकर आदी यावेळी उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे वतीने माउली वीर यांनी स्वागत करीत नारळ प्रसाद दिला. माऊलींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात श्री पांडुरंगरायांचे पादुका भेट झाली. पांडुरंगरायांचे पादुका पालखी सोहळ्यात 26 दिंड्या हरिनाम गजरात आळंदीत आल्याचे सोहळा प्रमुख मयुर ननवरे यांनी सांगितले. पंढरपूर येथून कार्तिकी पौर्णिमेला सुरु झालेला प्रवास अष्टमीला आळंदीत थांबला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)