पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान

नीरा- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील पाच वर्षांपासून आळंदीला जात आहेत. मंगळवारी दि. 27) पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात विठु नामाच्या जयघोषात मोठया भक्तीमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्‍काम आटपून पुणे जिल्ह्यात सकाळी अकराच्या सुमारास पालखीने प्रवेश केला.
पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी उपस्थित असतात, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. वासकऱ्यांची म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करुन सोहळा सुरु केला आहे. यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे 16 तर रथामागे 10 दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे सतरा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळा प्रमुख मयुर ननवरे यांनी दिली.
कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथून निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्‍काम आटपून सकाळी लोणंद येथे न्याहारी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी अकरा वाजता दाखल झाला. यावेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तीमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात आले. दत्त मंदिराचे पुरोहीत सचिन घोडके यांनी पादुकांचे स्वागत केले. दुपारच्या विसाव्यानंतर सोहळा पुणे जिल्ह्यातील वालमीक ऋषींच्या वाल्हा गावाकडे मार्गस्थ झाला. नीरेतील बाजारपेठेत पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)