पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगलचा डूडलद्वारे सलाम

नवी दिल्ली : पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला. आनंदीबाई जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडलद्वारे त्यांना सलाम केला आहे.

जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. ते स्वतः लोकहितवादीची शतपत्रे वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादीच्या शतपत्रांतून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १०च दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी. ची पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. हा खडतर प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित राहिले. पंडिता रमाबाई होत्या. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून प्रशंसा केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)