पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राची वाई तालुक्‍यात उभारणी

पांडवगड क्रीडा, कृषी व शैक्षणिक विकास संस्थेचा अभिनव उपक्रम
महिला कुस्ती केंद्राच्या भूमिपूजन समारंभ संपन्न
वाई : पांडवगड क्रीडा, कृषी व शैक्षणिक विकास संस्था, वाई यांच्यावतीने मेणवली, पांडेवाडी व भोगाव येथे पांडवगड क्रीडा संकुलाची उभारणी होत असून येथे जून 2019 पासून जिल्ह्यातील पहिल्या महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिेषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव (आबा) शिंदे व संस्थेचे कार्याध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे महिला कुस्ती केंद्र उभारण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव आंतराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक विठ्ठल गोळे यांनी दिली. नुकतेच या केंद्रांचा भूमीपूजन समारंभ संस्थेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर (सीईओ रामोजी फिल्म सिटी, हैद्राबाद), उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कार्याध्यक्ष पोपटलाल ओसवाल, सचिव विठ्ठल गोळे, सहसचिव पै. सोपान खोपडे, खजिनदार शंकरराव शिंदे, सहखजिनदार अतुल जाधव, प्रवर्तक पै. ऍड. अमोल शिंदे, अजय मांढरे, मधुकर चौधरी, धोंडीराम येवले, लतिफ पटेल, राहुल खरात, प्रमोद वरखडे, कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कणसे आदी मान्यवर व मेणवली, पांडेवाडी, भोगाव ग्रामस्थांचे उपस्थितीत करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. गोळे यांनी सांगितले, संस्थेतर्फे यंदाच्या वर्षापासून मल्लखांब, योगासने, जिम्नॅस्टिक, बॉक्‍सिंग, ज्युदो आदी क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर हॉलमध्ये देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे सामने मॅटवर होत असल्याने या केंद्रात मॅटची सोय करण्यात आली आहे. क्रीडा प्रशिक्षणाबरोबरच तालुक्‍यातील व जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलिस व सैन्यदलात भरती होण्यासाठी निवासी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र संस्थेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना सैनिकी कॅम्प वातावरणात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठ्ठल गोळे यांनी केले आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)