ओव्हल: भारत विरुद्ध इंग्लंड त्यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडची स्थिती १९८-७ बाद अशी झाली होती.दुसऱ्या दिवसाला खेळाला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंडचे तीन गडी शिल्लक होते. इंग्लंडच्या शेपटाने भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. कालच्या धावसंख्येमध्ये १३४ धावांची भर घालत इंग्लंडचा संघ ३३२ धावांपर्यंत मजल मारू शकला.
तत्पूर्वी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यास उतरलेल्या ऍलिस्टर कुकला भारतीय संघाने ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. जडेजाने  जेनिंन्ग्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मोईन अली फलंदाजीस आला. कुक आणि अली जोडीने आपली अर्धशतके पूर्ण केली.
कुक आणि अलीची जोडी फुटली आणि भारतीय गोलंदाज पुन्हा कसोटी सामन्यात वरचढ झाले. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला भोपळाही फोडता आला नाही. त्याला बुमराहने बाद केले. जॉनी बेअरस्टोवला देखील शून्यावर बाद व्हावे लागले त्याला इशांत ने यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पडले.एकवेळ इंग्लंड मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते पण भारतीयांनी दिलेल्या धक्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत आणि दिवसाअखेर ७ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावांपर्यंतच मजल गाठू शकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)